मुंबई

शरद पवारांचा मिडास टच, 'त्या' झोपडीचं पक्क्या घरात होणार रूपांतर

सकाळवृत्तसेवा

शहापूर : अगदी काही दिवसांपूर्वी म्हणजेच 30 जानेवारीला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी शहापूर तालुक्यातील वाऱ्याचापाडा येथील झोपडीत जेवण केलेलं. हे जेवण करून झाल्यावर 'मला या जेवणाची आयुष्यभर आठवण राहील' असं सुद्धा शरद पवार म्हणाले होते. दरम्यान शरद पवार यांनी जेवण केलेल्या त्या कुडाच्या भिंतींच्या झोपडीचं आता घरात रूपांतर होणार आहे. जिजाऊ सामाजिक शैक्षणिक संस्थेने यासाठी पुढाकार घेतलाय. 

३० जानेवरी रोजी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे शहापूर दौऱ्यावर होते. यावेळी शरद पवार यांच्या हस्ते जिजाऊ सामाजिक शैक्षणिक संस्थेचा भूमिपूजन सोहळा पार पडला. यानंतर त्यांनी  वाऱ्याचापाडा इथल्या डिजिटल शाळेला भेटही दिली होती. याचदरम्यान शरद पवार यांनी याच पाड्यातील एका झोपडीत आदिवसी महिलेने बनवलं जेवण देखील घेतलं होतं.  

शरद पवार यांनी जेवण केलेल्या खोडके दाम्पत्याच्या घरात अठरा विश्व दारिद्र्य आहे. शरद पवार यांनी जेवण करताना या कुटुंबाची माहिती घेतली आणि या कुटुंबाला घरं बांधून दिलं पाहिजे असा त्यांनी निश्चय केला. आता खुद्द शरद पवारांनी निश्चय केल्याचं कार्यकर्त्यांना समजताच तातडीने ते कमला लागले आणि आता घराच्या कामाला सुरवात झालीये. कार्यकर्त्यांच्या माहितीनुसार येत्या १५ दिवसात या घराचं काम पूर्ण करणार असल्याचं समजतंय.   

after sharad pawars midas touch that hut wil be redeveloped as house

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2025: 'यार हे कोणाला बाहेर ठेवणार?', भारताचा संघ पाहून शोएब अख्तर चक्रावला; पाहा काय म्हणाला

Banjara community Reservation : बंजारा समाजाला हैद्राबाद गॅझेटियरनुसार आरक्षण द्या; आ. संजना जाधव यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Maharashtra Rain Update: मुंबई पुणेकरांनो सावधान! हवामान खात्याचा सतर्कतेचा इशारा

Pune Police : घराचा धागा पुन्हा जुळला; पोलिसांनी तरुणीला दिला मायेचा आधार

Latest Marathi News Updates Live: रानडुक्कर शिकारप्रकरणी सात जण अटकेत

SCROLL FOR NEXT